पहिल्याच दिवशी 1 हजार जणांची मैदानी चाचणी
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनानंतर होत असलेल्या सातारा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पहाटे पाच वाजता सातारा पोलीस कवायत मैदानावर पहिला लॉट मैदानी चाचणीसाठी घेण्यात आला. त्यानंतर दिवसभर तब्बल 1 हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली. बहुतांशी उमेदवारांना रिजेक्ट करण्यात आल्याने नाराजीचा सूर उमेदवारांमध्ये दिसून येत होता. भरतीच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अधिकाऱयांनी भेटी दिल्या.
सातारा पोलीस दलामध्ये कोरोनानंतर भरती प्रक्रिया काढण्यात आलेली होती. त्याकरता अतिशय कमी जागा म्हणजे 145 जागांसाठी ही भरती आहे. त्यात खुल्या प्रवर्गातील जागांची क्षमता कमी असल्याने अनेकांनी अर्जही भरले नाहीत. तरीही चांगला प्रतिसाद या भरतीला मिळालेला आहे. तब्बल 7 हजार 769 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. भरती प्रक्रिया नियोजनबद्ध राबवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संबंधितांना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार सातारा पोलीस दलाचे अधिकारी भरती प्रक्रिया राबवत आहेत. पहाटे पाचपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. पोलीस कवायत मैदानावर कागदपत्रे पाहून सोडले जात होते. धावणे, लांब उडी, वजन, उंची हे पाहून अनेकजण रिजेक्ट झाले. रिजेक्ट झालेले तरुण नाराज होऊन पुढच्या भरतीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, सायंकाळी गुरुवारी होणाऱया लॉटसाठी इच्छुकांनी साताऱयात हजेरी लावली होती.
कोणत्याही आमिषाला बळी पडून नये जिह्यात सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही अमिषास बळी पडू नये. कोणत्याही मोठय़ा अधिकाऱयांचे, नेत्यांचे, मंत्र्यांचे नाव घेऊन फोन आला तर त्यास भुलू नये. त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात याची खबर द्यावी. हि प्रक्रिया डिजिटल असून यात कोणत्याही मानवी हस्तक्षेप होणार नाही तरी अमिषास बळी पडू नका तुमची निवड तुमच्या पात्रतेनुसारच होईल.