वृत्तसंस्था/ दोहा
तब्बल एक वर्षांनंतर भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने डब्ल्यूटीए सर्कीटमध्ये आपले दमदार पुनरागमन शानदार विजयाने केले आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झाने महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
या स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिची स्लोव्हेनियाची साथीदार क्लिपॅक या जोडीने महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात युक्रेनच्या नादिया किचनॉक आणि लुडमिला किचनॉक यांचा 6-4, 6-7 (5-7), 10-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. सानिया मिर्झाने यापूर्वी आपला शेवटचा सामना 2020 च्या फेब्रुवारीमध्ये खेळला होता.