कोलकात्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडणार
महिला पुजाऱयांच्या पूजेत श्लोक, मंत्रांसोबत रवींद्र संगीत देखील
यंदाच्या नवरात्रोत्सवात कोलकात्यामध्ये एक नवे उदाहरण प्रस्थापित होणार आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिक दुर्गा पूजा 4 महिला पुजाऱयांच्या हातून घडणार आहे. साउथ कोलकाता क्लबने याकरता पाऊल उचलले आहे. क्लबमध्ये पूजा करविणाऱया 66 पल्ली पूजा समितीचे प्रद्मुम्न मुखर्जी यांनी याविषयी माहिती दिली आहे. खूंटी पूजेपासून (मंडप उभारण्याची प्रारंभिक पूजा) विजयादशमीपर्यंत एखाद्या महिला पुजाऱयाने पूजा करण्याचा प्रकार यापूर्वी कधीच घडलेला नाही. पण आमच्या क्लबमध्ये चार महिलांच गट ही नवी परंपरा सुरू करणार असल्याचे मुखर्जी म्हणाले.

पूजेच्या मंत्रांसोबत रवींद्र संगीत, रजनीकांता, द्विजेंद्रगीत यासारख्या विविध शैलींचे गीत यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे. डॉ. नंदिनी भौमिक, रुमा रॉय, सेमांती बॅनर्जी आणि पॉलोमी चक्रवर्ती एक दशकापासून शहरात विवाह, गृहप्रवश यासारखे विविध विधी करत आहेत. पण पुजारी म्हणून पहिल्यांदाच मूर्ती पूजा करणार आहेत. आधुनिकी पिढीला धर्मग्रथांची व्याख्या समजून घेण्याच गरज आहे. लोक या बदलाला स्वीकार करतील अशी अपेक्षा असल्यानेच यंदाच्या पूजेची थीम ‘देवीची पूजा मातांकडून’ अशी ठेवण्यात आल्याचे मुखर्जी यांनी सांगितले आहे.
आम्ही पौराहित्याला एका कलेत बदलण्यासाठी व्यापक स्तरावर संशोधन करत आहोत. सद्यकाळात अनेक लोक पूजेच्या विधीत सामील होण्याऐवजी अन्य गोष्टींशी जोडणे जाणे पसंत करतात असे आम्हाला आढळून आले आहे. अशा लोकांना स्वारस्यासह पूजा कार्यात जोडणे आमचा उद्देश असल्याचे नंदिनी यांनी म्हटले आहे. नंदिनी यांच्या जीवन आणि कामापासून प्रेरणा घेत ‘ब्रह्मा जानेन गोपोन कोम्मोटी’ नावाचा (गोपनीय कामे कोणती हे ब्रह्मच जाणे) चित्रपट तयार करण्यात आला होता.