वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार दीपक केसरकर यांनी नवीन एक्स-रे आणि ईसीजी मशीन जिल्हा नियोजनमधून उपलब्ध करून दिली आहे. उपजिल्हा रुग्णालयात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरही उपचार करण्यात येत आहेत. यासाठी दहा बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गंभीर स्थितीत दाखल होणाऱया रुग्णांवर येथे उपचार केले जात आहेत.
या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांपूर्वीच दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात नऊ गंभीर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयात डॉ. अभिजीत चितारी, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. संदीप सावंत, डॉ. पांडुरंग वजराटकर यांची टीम कार्यरत आहे.
आमदार दीपक केसरकर यांनी गेल्याच आठवडय़ात सर्व खात्यांच्या अधिकाऱयांची बैठक घेतली. त्यावेळी रुग्णालयाला सर्व सुविधा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. रुग्णालयाला भेडसावणारा पाणी प्रश्न त्यांनी निकाली काढला आहे. त्याचबरोबर एक्स-रे मशीन उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर ईसीजी मशिनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्यंत गंभीर रुग्णांसाठी ही ईसीजी मशीन गरजेची होती.