20 बाय 45 फुटाची प्रतिकृती
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सोलापूरातील स्पर्श रंग कला परिवार यांनी सात रस्ता येथील लक्ष्मीबाई भाऊराव महीला महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची आकर्षक भव्य अशी 20×45 फूट (900 sq km) रांगोळीतून प्रतिकृती साकारली आहे. यासाठी 45 तास लागले आहित. ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
यावेळी मिरजकर सोबत सहभागी कलाकार सागर भारती, विपुल मिरजकर प्रमोद दसरी, रुचिता आडम, मनीषा चिलका, दिव्या चिलका, धनश्री मिरजकर आणि ऋतुजा पवार यांनी परिश्रम घेतले.