बेळगाव, खानापूर तालुक्यात चार ठिकाणी तपासणी
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील सार्वजनिक बांधकाम, जल परिवहन विभागाच्या साहाय्यक अभियंत्याच्या घरावर शुक्रवारी एसीबीच्या अधिकाऱयांनी छापा टाकला आहे. बेळगाव, खानापूर तालुक्मयात चार ठिकाणी छापे टाकण्यात आले असून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री एसीबीच्या अधिकाऱयांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती दिली. मनोज सुरेश कवळेकर यांच्या अयोध्यानगर येथील घर, मनोजची बहीण ज्योती यांच्या घरातही तपासणी करण्यात आली आहे. मनोज यांची आणखी एक बहीण राजश्री यांच्या महाद्वार रोड येथील मल्हार रेसीडेन्सीमधील फ्लॅटवरही छापा टाकण्यात आला आहे.

मनोज यांचे कार्यालय व बहीण राजश्री कवळेकर यांच्या नावे असलेल्या खानापूर तालुक्मयातील संगरगाळी येथे असलेल्या फार्महाऊसवरही अधिकाऱयांनी छापा टाकला. रात्री उशीरापर्यंत तपासणी सुरू होती. या छाप्यात नेमके कितीचे घबाड उघडकीस आले याचा तपशील उपलब्ध झाला नाही. बेळगाव उत्तर विभागातील बेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड जिल्हय़ातील अधिकारी या मोहिमेसाठी बेळगावात आले आहेत. एसीबीचे पोलीस प्रमुख बी. एस. नेमगौडा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधिक्षक वेणुगोपाल, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप, बी. ए. जाधव, सुनीलकुमार, हरिश्चंद्र, मंजु हिरेमठ आदी अधिकाऱयांनी या कारवाईत भाग घेतला.