बेंगळूर : राज्य राजकीय परिस्थितीविषयी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंगळवारी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या नवी दिल्ली दौऱयावर गेले होते. सायंकाळी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. याप्रसंगी उभयतांमध्ये राज्य राजकीय परिस्थितीविषयी चर्चा झाली. आरक्षणाच्या मुद्दय़ावरून भाजप आपल्याविरुद्ध मोट बांधत आहे. त्यामुळे प्रत्युत्तर म्हणून अल्पसंख्याक, मागासवर्ग आणि दलितांचे (अहिंद) मेळावे घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती सिद्धरामय्या यांनी केली होती. त्यावर राहुल गांधी यांनी संमती दिली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मेळावे होतील.
Previous Articleद. आफ्रिका, ब्राझीलमधून येणाऱया प्रवाशांना कोविड चाचणीची सक्ती
Next Article केंद्र सरकारविरोधात उद्या शेतकऱयांचा ‘रेल रोको’
Related Posts
Add A Comment