नवी दिल्ली
लॉकडाऊनमुळे नागरिकांतून रिफिल सिलिंडर बुकींच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे इंधन कंपन्यांनी रिफिल सिलिंडर बुकींगसाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे एक सिलिंडरचे वितरण केल्यानंतर दुसरा सिलिंडर नोंदण्यासाठी ग्राहकांना 15 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. सिलिंडर वितरणामध्ये गोंधळ होऊन टंचाई निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर देशात सर्वच ठिकाणी सिलिंडरचा योग्य साठा आहे. सर्वांना सिलिंडर मिळणार असल्याने कोणीही जादा सिलिंडरचा अकारण साठा करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. इंडियन ऑईल कार्पोरेशनचे ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.