अमली पदार्थ थोपविण्यासाठी पी. एस. संधू यांनी केल्या सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
सीआयडी विभागाचे प्रमुख पोलीस महासंचालक पी. एस. संधू यांनी गुरुवारी बेळगावात वरि÷ पोलीस अधिकाऱयांची बैठक घेतली. शहर व ग्रामीण भागात फोफावत चाललेल्या अमली पदार्थांची तस्करी थोपविण्यासाठी त्यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या.
यापूर्वी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक पदावर त्यांनी सेवा बजावली आहे. गुरुवारी ते बेळगाव दौऱयावर होते. आपल्या या दौऱयात पोलीस मुख्यालयात वरि÷ पोलीस अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, सीआयडी नार्कोटिक्स विभागाच्या पोलीसप्रमुख वर्तिका कटियार आदी अधिकाऱयांनी भाग घेतला होता.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर आदी अधिकाऱयांनी बैठकीत बेळगाव शहरातील सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत अमली पदार्थांची विक्री फोफावू नये यासाठी अधिकाऱयांनी दक्षता घेण्याची सूचना सीआयडी प्रमुखांनी केली.
खासकरून शहरी भागात ड्रग्ज माफिया कशा पद्धतीने काम करते? याची माहिती मिळवून त्यांचे कंबरडे मोडण्याची गरज आहे. कारण तरुणाई नशेच्या आहारी जाऊ नये याची खबरदारी घेण्याची प्रत्येकावर जबाबदारी आहे. अमली पदार्थ विक्री करणाऱयांचे नेटवर्क कसे चालते, याचा अभ्यास करून अधिकाऱयांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना पी. एस. संधू यांनी दिली. यावेळी बेळगाव शहर व जिह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.