करमाळा / प्रतिनिधी
सध्या सर्वदूर परतीच्या पावसाने थैमान घातले असल्याने गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच सीना नदीला महापूर आलेला पाहायला मिळत आहे. सध्या सीना नदी ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. उद्यापर्यंत पाण्याची पातळी वाढली तर करमाळा तालुक्यातील आवाटी तर परंङा तालुक्यातील रोसा ही गावे नदी किनारी असल्याने धोका संभवत असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना नदीच्या पाण्यापासून नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच सिना नदीवर आवाटी गावाजवळ कोळगाव धरण असून ते शंभर टक्के भरले आहे.
काल (ता.१४) दिवसभर झालेल्या पावसाने पावसाने ओढे, नाले, नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून हा पाऊस काही शेतकऱ्यांना लाभदायक तर काही काही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरला आहे. परंतु या पावसाने नुकत्याच पेरणी केलेल्या ज्वारीच्या पिकाचे तसेच कांदा, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने सीना नदीला पाणी वाढले जाते. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील सर्वच बंधारे ओसंडून वाहत आहेत. येथील सांगोबा (ता.करमाळा) येथील बंधारा पुलाच्या कठड्याला पाणी आलेले पहायला मिळत आहे. अजून येत्या २४ तासात पाऊस झाला तर हे पाणी पुलाच्या वरून वाहणार आहे. परंतु जर हे पाणी पुलाच्या वरून वाहिले तर करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Trending
- पाकला नमवत भारतीय युवकांनी जिंकला आशिया चषक
- एलिस मर्टेन्स, आर्यना साबालेन्का चौथ्या फेरीत
- रेल्वे अपघातात 50 ठार
- कायद्याला वाकुल्या दाखविणाऱ्या विधानसभा
- तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत उदासीनता का ?
- ‘रिझनेबल टाइम’मध्ये शिंदे सरकार गतिमान!
- लक्ष्य सेन सेमीफायनलमध्ये
- भारतीय वंशाचा देव शाह स्पेलिंग बी चॅम्पियन