ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत लावणार जाणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी बोर्डाकडून करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देताना परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या उर्वरित बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या असल्याचे परिपत्रक काढले आहे. तसेच आता बोर्डांना गुणांबाबत निकष ठरवण्याचे अधिकारही दिले आहेत. तसेच रद्द झालेल्या परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी मूल्यांकन योजनेची अंमलबजावणी करण्यास परवानगी दिली आहे.

तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना आपले गुण वाढवण्यासाठी पर्यायी परीक्षा देण्याची संधी देखील दिली आहे. जे विद्यार्थी परीक्षा देण्याचा निर्णय घेतील, त्यांना त्या परीक्षेत मिळालेले गुणच अंतिम मानले जातील.
मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांना पर्यायी परीक्षा देण्याची संधी दिली जाणार नाही. बोर्ड द्वारे देण्यात आलेले गुणच अंतिम ठरवले जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.