ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून भारतीय लष्कराला ‘भारत’ हा ड्रोन देण्यात आला आहे.
पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषा तसेच उंचीवरील भाग आणि पर्वतीय भागांमध्ये लक्ष ठेवण्यासाठी हा ड्रोन लष्कराला मदत करणार आहे. डीआरडीओच्या चंदीगड येथील प्रयोगशाळेत या ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे. हा ड्रोन ‘भारत’ मालिकेतील जगातील सर्वात वेगवान व वजनाने हलका आहे.
स्वदेशी बनावटीच्या या ड्रोनची युनिबॉडी डिझाईन आणि ॲडव्हान्स रिलीज टेक्नॉलॉजी याला पाळत ठेवण्याच्या कामात अधिक उपयुक्त बनवते. हा ड्रोन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने परिपूर्ण असे आहे. याला कोणतेही रडार डिटेक्ट करू शकत नाही. रात्रीच्या अंधारातही अत्यंत स्पष्टपणे छायाचित्र किंवा हालचाली दाखवण्याची यामध्ये क्षमता आहे.भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डीआरडीओने हा ड्रोन तयार केला आहे.