प्रकल्पस्थळी सुरू असलेल्या विविध संरक्षण संबंधित कामांची केली पाहणी
प्रतिनिधी / कारवार
केंद्र सरकारच्या संसदीय संरक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष जुएल ओरम यांच्या नेतृत्त्वाखालील लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचा समावेश असलेल्या सोळा खासदारांनी बुधवारी येथून जवळच्या अरगा येथील आयएनएस कदंबा नौदल (सी-बर्ड) प्रकल्पाला भेट दिली आणि प्रकल्पस्थळी सुरू असलेल्या विविध संरक्षण संबंधित कामांची पाहणी केली.
आयएनएस कदंबा नौसेना प्रकल्प कारवार व अंकोला तालुक्यातील किनारपट्टीवरील हजारो हेक्टर जमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून आकार घेत आहे. हा प्रकल्प दक्षिण आशियातील सर्वात मोठा प्रकल्प आणि भारतीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठित मानला जातो. या प्रकल्पाच्या दुसऱया टप्प्याच्या उभारणीला 2018 मध्ये सुरुवात केली आहे. दुसऱया टप्प्यावर सुमारे 13 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. देशातील अन्य ठिकाणच्या नौदल प्रकल्पस्थळी ज्या सुविधा उपलब्ध नाहीत, अशा काही सुविधा सी-बर्ड प्रकल्पस्थळी यापूर्वीच उभारण्यात आल्या आहेत. तरंगते बेट म्हणून ओळखल्या जाणारी आयएनएस विक्रमादित्य युद्धनौका नांगरण्याची सुविधा सी-बर्ड प्रकल्पातील बंदारात उपलब्ध आहे. परिणामी केंद्र सरकारच्या अखत्यारितीतील संरक्षण खात्याची किंवा या खात्याशी सलग्न असलेल्या संसदीय समितीची बारीक नजर नेहमीच सी-बर्ड प्रकल्पाकडे असते. याचाच भाग म्हणून बुधवारी संसदीय संरक्षण समितीचे स्थायी समितीच्या सदस्यांनी आणि नौसेनेच्या व संरक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांनी भेट दिली.
एनसीपीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्यासह 30 जणांची भेट
प्रकल्पाला भेट दिलेल्यामध्ये समितीचे अध्यक्ष जुएल ओरम, एनसीपीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, विजयेंद्र सिंग, डॉ. अशोक वाजपेयी, प्रेमचंद्र गुप्ता, कुमार डेनीश अली, अजय भट, आण्णासाहेब जोल्ले, राम शंकर कटारियासह 30 खासदारांनी आणि वरिष्ठ अधिकाऱयांनी भेट दिली.
महेश सिंग यांनी प्रकल्पाबद्दल माहिती दिली
रिय ऍडमिरल महेश सिंग यांनी भेट दिलेल्या पथकातील सदस्यांची प्रकल्पस्थळी स्वागत केले. त्याचबरोबर सिंग यांनी येथील नेवलशीप रिपेअर यार्ड, आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेच्या क्षमतेबद्दल नेवल हारबर, शीपलिफट सुविधा आणि प्रकल्पस्थळी हाती घेतलेल्या महत्त्वपूर्ण कामांची माहिती दिली. आता हे पथक सी-बर्ड प्रकल्पाच्या वाटचालीबद्दल अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे.
राहुल गांधीनी भेटीकडे फिरविली पाठ
एआयसीसीचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधीही या प्रकल्पाला भेट देणार होते, असे सांगण्यात आले होते. तथापि गांधी यांचे आगमन झाले नाही. कर्नाटकचे खासदार प्रताप सिंह यांनीही भेट टाळली. तथापि मंत्री शशीकला जोल्ले यांनी प्रकल्पाला भेट दिली. जोल्ले यांचे कारवारच्या आमदार रुपाली नाईक यांनी प्रकल्पस्थळी स्वागत केले.
12 वाजता आगमन, पाच वाजता परतीचा प्रवास बुधवारी सकाळी सीमेवर 12 वाजता दाखल झालेल्या पथकाचे कर्नाटक-गोवा सीमेवर 12 वाजता आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनानातर्फे सर्वांचे स्वागत करण्यात आले. प्रकल्प भेटीनंतर पथकाने 5 वाजता गोव्याकडे प्रयाण केले, असे सांगण्यात आले.