प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक समृध्द खजिना मोड आलेली कडधान्ये. अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश म्हणजे आरोग्याची गुरूकिल्ली. मोड आलेल्या कडधान्याला ’सुपरफूड’ असं म्हटलं जातं. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये असायलाच हवीत.

कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्त्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. ‘क’ जीवनसत्त्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो. कडधान्यांना मोड आणून खाण्याची जुनी आणि चांगली परंपरा आहे. सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी. नंतर उडीद आणि हरभरा, कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असतात.

? उन्हाळय़ात सगळय़ात गुणकारी ठरते सुपरफूड
? मोड आलेली कडधान्ये यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व आढळतात.
? मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असतं.
? मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो.
? मोड आणल्यामुळे टॅनीन आणि फॅटीक अŸसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होतं. ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो.
? मोड आणल्यामुळे कडधान्यं हलकी होतात आणि सहज पचतात.
? मोड आलेली कडधान्ये सुकवल्यानंतर त्यातल्या कर्बोदकांचं आणि ‘क’ जीवनसत्त्वाचं प्रमाण वाढतं.
? मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय वाढते.
? मोड आलेल्या धान्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्त्वे, खनिजं आणि कर्बोदकं असतात. ज्यांचा दररोजच्या आहारात समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहतं.