वार्ताहर/मुरगूड
सुरूपली ता. कागल येथील ज्ञानदेव कृष्णा पाटील यांच्या राहत्या घरात स्वयंपाक करीत असताना गॅसने अचानक पेट घेवून टाकीचा स्फोट झाला. यात घरासह प्रापंचिक साहीत्य, रोख रक्कम, सोन्याचे ऐवज जळून खाक झाले. १0 लाखाच्यावर प्राथमिक नुकसानीचा आकडा आहे. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही
हनुमान गल्लीत ज्ञानदेव पाटील हे शेतकरी आपल्या पत्नीसह राहतात आज सायकांळी ७ .३० वा. च्या सुमारास त्यांच्या पत्नी गॅसवर स्वयंपाक करीत असताना गॅसने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच टाकीचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. गॅसच्या फुटलेल्या टाकीचे तुकडे सुमारे १०० फूटावर फेकले गेले होते .
स्फोटामुळे आग जोराची भडकली व क्षणाधार्थ घर जळून खाक झाले. या आगीत सर्व प्रापचिक साहित्य, रोख १५ हजार रु., सोन्याच्या दोन अंगठ्या, धान्य व घर जळून खाक झाले. प्रारंभी गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने मंडलिक साखर कारखान्याचा अग्नीशामक बंब बोलावण्यात आला. तासभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने ही आग शेजारील घरांना लागली नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला . घटनेची माहीती मिळताच मुरगूडच्या स.पो.नि. विद्या जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. गरीब शेतकऱ्याचा घरासह सारा संसार च जळून खाक झाल्याने कुंटूंब उघडयावर पडले आहे. शासनाने या कुंटूबाला मदत करावी अशी मागणी होत आहे.
Previous Articleगुहागर तालुक्यात सडे जांभारी येथील गरोदर महिलेला कोरोना
Next Article गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचे आठ नवे रुग्ण
Related Posts
Add A Comment