2020 च्या पहिल्या तिमाहीतील कामगिरी : रेडमी 8 दुसऱया स्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन वर्ष 2020 ची सुरुवात झाली असून यातील पहिल्या तिमाहीत कामगिरी केलेल्या कंपन्यांची आकडेवारी सादर करण्यात येत आहे. यामध्ये नव्या कमाईचे आकडे, नफ्यातील घट व अन्य उत्पादनासंदर्भातील तपशील कंपन्यांकडून सादर केला जात आहे. यात जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये चिंता करण्यासारखे वातावरण निर्माण होत असले तरी या बंदच्या काळातही सॅमसंग गॅलेक्सी ए 51(4 जी) ची विक्री जगात सर्वाधिक झाली असल्याचा दावा रिसर्च फर्म स्ट्रटजी ऍनालिस्टने केला आहे.
60 लाख गॅलेक्सी ए 51 फोन विकण्यात आले आहेत. सोबत रेडमी 8 हे मॉडेल विक्रीत दुसऱया स्थानी राहिले आहे. सर्वाधिक विक्री होणाऱया फोनच्या यादीत पहिल्या चार नंबरमध्ये सॅमसंग आणि शाओमीचे फोन असल्याचे म्हटले आहे. या कामगिरीमुळे स्मार्टफोन बाजारात सॅमसंग गॅलेक्सीचा ए51 (4जी)चा वाटा शेअर बाजारात 2.3 टक्के इतका आहे तर दुसऱया स्थानी 1.9 टक्के वाटय़ासह रेडमी 8 दुसऱया स्थानावर आहे. गॅलेक्सी एस20+ तिसऱया क्रमाकांवर राहिला आहे.