वृत्तसंस्था/ बेंगळूर
सॅमसंग गॅलेक्सी एम 33 हा 5जी स्मार्टफोन शनिवारी कंपनीने लाँच केला आहे. एम सिरीज अंतर्गत येणारा हा नवा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. मागच्या वर्षी दाखल झालेल्या गॅलेक्सी एम 32 5जी या स्मार्टफोनची ही सुधारित आवृत्ती असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 120 हर्टस् डिप्रेश रेट डिस्प्लेसह एक्सिनोस प्रोसेसर या फोनला असेल. 8 जीबी रॅमसह 50 मेगापिक्सलचा कॅमेरा याला असेल.

गॅलेक्सी एम 33 5जी 6 जीबी व 128 जीबी स्टोअरेजसह येणाऱया स्मार्टफोनची किमत 18,999 रुपये पासून सुरू होते. 8 जीबी व 128 जीबी स्टोअरेजच्या फोनची किंमत 20,499 रुपये इतकी असणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत सवलतीत 17,999 रुपये, 19,999 रुपये इतकी असणार असल्याचे कंपनीने सांगून ग्रीन आणि ब्ल्यू रंगामध्ये तो ग्राहकांना खरेदी करता येईल.
फोनची वैशिष्टय़े
w 6.6 इंच फुल एचडी इनफिनिटी व्ही डिस्प्ले
w ऑक्टाकोअर 5 एनएम ऍक्सीनोस प्रोसेसर
w 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोअरेज
w 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
w 6000 एमएएचची दमदार बॅटरी तसेच 25 व्हॅट फास्ट चार्जिंग सुविधा
w 5जी, वायफाय, ब्ल्युटूथ आणि जीपीएसची सुविधा.
w अँड्रॉईड 12 वर चालणार