चिकोडी तालुक्मयातील तिघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीमुळे चिकोडी तालुक्मयातील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांत एका महिलेचा समावेश आहे. सोमवारी जिल्हय़ात 18 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 42 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 79 हजार 218 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 77 हजार 981 जणांनी कोरोनावर मात केली असून अद्याप 347 जण सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये चिकोडी तालुक्मयातील 82 वषीय वृद्धा, 49 व 65 वषीय कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा सरकारी आकडा 890 वर पोहोचला आहे. अथणी, बैलहोंगल, चिकोडी, खानापूर, रायबाग तालुक्मयात सोमवारी एकही रुग्ण आढळून आला नाही. बेळगाव तालुक्मयात 10, गोकाक तालुक्मयात 2, रामदुर्ग तालुक्मयात 1 तर हुक्केरी तालुक्मयात 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या 24 तासात 3 हजार 353 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 1 हजार 696 जणांचे अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत 12 लाख 31 हजार 436 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 45 हजार 871 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.