1 हजार 302 जणांचा अहवाल निगेटिव्ह
प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी बेळगाव शहर व जिह्यातील 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून गेल्या 24 तासांत 1 हजार 302 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला अद्याप 2 हजार 845 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतिक्षा आहे. सोमवारी 1300 हून अधिक जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने बेळगावकरांना दिलासा मिळाला आहे. वेगवेगळय़ा इस्पितळात 206 सक्रिय रुग्ण आहेत.
जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 205 इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 342 जणांचा मृत्यू झाला आहे. 25 हजार 657 जणांनी कोरोनावर मात केली असून अद्याप 44 हजार 150 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
सोमवारी शहापूर येथील एका वृध्दाचा व गोकाक तालुक्मयातील पटगुंदी येथील तीघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 14 वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे. आतापर्यंत 3 लाख 72 हजार 999 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 3 लाख 41 हजार 958 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.