नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा इशारा
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर शहर जिल्ह्यातील सलून मागील तीन महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे येत्या 30 जूनपर्यंत शहरातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाभिक समाजाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आज शनिवारी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलून दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अनलॉक मध्ये सोलापूरसह राज्यातील विविध शहरात दुकाने उघडण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर अकोला येथील जिल्हाधिकाऱ्यांना भेटून नाभिक समाजाचे सलुन दुकान सुरू करण्यास संदर्भात निवेदन दिले. राज्य सरकारलाही याविषयी मागणी केली. दरम्यान सोलापूर शहरातील उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनास यापूर्वी देण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील सलून दुकान येत्या 30 जून पर्यंत उघडण्यास परवानगी न दिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाभिक समाजासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा नगरसेवक चंदनशिवे यांनी दिला.
Related Posts
Add A Comment