तरुण भारत संवाद, प्रतिनिधी/ सोलापूर
सोलापुरात कोरोनाबाधित आणखी तीन रुग्ण आढळले आहेत. आज दोन पुरुष आणि एक महिला कोरोना बाधित आढळली. सोलापुरात कोरोनाची संख्या 68 वर पोहोचली आहे. आजपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 62 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याच. माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज मंगळवारी दिली.
रेल्वे स्टेशन परिसर 1, सिद्धेश्वर पेठ 1 हे दोन रुग्ण सारीचे आहे तर एक 76 वर्षीय पुरुष बापूजी नगर येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आली होती. त्याचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज एकूण55 अहवाल प्राप्त झाले होते त्यापैकी 55 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर उर्वरित 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 1469 व्यक्ती होते त्यापैकी 1133 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी 1065 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर 336 व्यक्तीचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.एकूण 68 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापुरात नव्याने तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे सोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे..
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वरटाईनमध्ये: 1973
आयसोलेशन वार्डात – 1469
-एकूण अहवाल प्राप्त : 1133
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 336
-आतापर्यंतअहवाल पॉझिटिव्ह: 68
-मृत : 06