रांगोळी काढण्यासाठी लागले तब्बल 18 तास
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मागील तीन चार महीन्यापासून संपुर्ण जगभरात कोरोनामुळे जागतिक स्तरावर महामारीने धुमाकूळ घातला आहे. त्यामध्ये आपला भारत देश सुध्दा या महामारीचा बळी ठरला असून, खूप मोठे संकट उभे राहिले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस खाते, प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका, महसुल विभाग, जिल्हा परिषद कर्मचारी, पत्रकार बंधू आणि सर्व विभागातील सफाई कामगार या सर्वांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबियांचा विचार न करता कोरोनाच्या विरोधात सर्व लोकांचा जीव वाचवण्यासाठी तसेच जी काही मदत करणे शक्य आहे. ती मदत एका योध्दाप्रमाणे लढा देवून संकटाशी सामना केला.

या सर्व योद्ध्यंना स्फूर्ती येऊन पुन्हा अशा संकटकाळी उभे राहण्याची प्रेरणा मिळावी म्हणून सोलापूर येथील सिध्दार्थ नगरमध्ये राहणारे रांगोळी कलाकार सागर सुब्रमणी भारती यांनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये 5×3 फुटाची या योद्धा रांगोळीच्या माध्यमातून चित्र काढून स्वातंत्र्य दिनानिमित्त सलाम केला आहे. रांगोळी काढण्यासाठी त्यांना 18 तास लागले. या अगोदर सुध्दा सागर यांनी महापुरूषांची रांगोळीच्या माध्यमातून चित्र काढले आहेत. त्यांच्या रांगोळीची 2016 मध्ये ‘गिनिज बुक’मध्ये नोंद झाली आहे.