प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात रविवारी 506 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 333 पुरुष, 173 स्त्रियांचा समावेश आहे. आज 11 तर आतापर्यंत 572 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 20 हजार 884 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 941 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3391 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2885 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 506 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 20 हजार 333 रुग्णांपैकी 12 हजार 879 पुरुष, 8 हजार 5 स्त्री आहेत. आतापर्यंत 572 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 13 हजार 371 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 829
मंगळवेढा- 983
बार्शी – 3954
माढा- 2079
माळशिरस – 3148
मोहोळ- 913
उत्तर सोलापूर – 648
करमाळा- 1550
सांगोला – 1386
पंढरपूर 4200
दक्षिण सोलापूर – 1386
एकूण – 20, 884
होम क्वांरटाईन – 5433
एकूण तपासणी व्यक्ती- 159620
प्राप्त अहवाल- 159542
प्रलंबित अहवाल- 78
एकूण निगेटिव्ह – 138658
कोरोनाबाधितांची संख्या- 20, 884
रुग्णालयात दाखल – 6941
आतापर्यंत बरे – 13371
मृत – 572
Previous Articleपावसाने पुलांवर पाणी ; पंढरीचे तीन महामार्ग बंद
Next Article डिचोली तालुक्मयात शनिवारी 57 कोरोना रूग्ण सापडले
Related Posts
Add A Comment