प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात सोमवारी 378 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 162 पुरुष, 147 स्त्रियांचा समावेश आहे. आज 7 तर आतापर्यंत 666 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 24 हजार 374 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 397 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1519 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1141 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 378 पॉझिटिव्ह आढळल्या आहे.आतापर्यंत 666 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 17 हजार 311 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1020
मंगळवेढा- 1132
बार्शी – 4487
माढा- 2445
माळशिरस – 3966
मोहोळ- 1029
उत्तर सोलापूर – 683
करमाळा- 1841
सांगोला – 1776
पंढरपूर 4749
दक्षिण सोलापूर – 1246
एकूण – 24, 374
होम क्वांरटाईन – 4350
एकूण तपासणी व्यक्ती- 180435
प्राप्त अहवाल- 180339
प्रलंबित अहवाल- 97
एकूण निगेटिव्ह – 155965
कोरोनाबाधितांची संख्या- 24, 374
रुग्णालयात दाखल – 6397
आतापर्यंत बरे – 17,311
मृत – 666