तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिह्यातील कोरोनाबाधितांचा चढता आलेख कायम असून ग्रामीणच्या तुलनेत शहरातील संसर्गाची गती अधिक आहे. जिल्ह्यात पंढरपूर, बार्शी, माळशिरस हे तिन्ही तालुके रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूसंख्येतही टॉप थ्रीमध्ये आहेत. 1 मार्च रोजी जिल्ह्यातील रुग्णसंख्या 77 इतकी होती तर 3 एप्रिल रोजी हा आकडा 777 पर्यंत गेला आहे. मागील महिन्याभरात जिल्ह्यात 10 हजार 929 नव्या रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्येत 11 पटीने वाढ झाल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट होते.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 मार्चपासून नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटाइजरचा आदींचे नियम सक्ती करण्यासाठी कारवाई सुरु केली. वाढत्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना, पंचसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आले. तरीदेखील शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत आहे. मागील महिन्याभरात शहरात 4 हजार 520 तर ग्रामीणमध्ये 6 हजार 409 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 8 मार्चपर्यंत जिह्याची परिस्थिती तशी नियंत्रणात होती. त्यानंतर मात्र कोरोनाचा चढता आलेख कायम राहिला.
16 मार्चनंतर रुग्णसंख्या अडीचशेपार गेली. अवघ्या दोन दिवसात तीनशे पार तर 14 मार्चनंतर पावणे पाचशेचा आकडा गाठत मागील आठ दिवसांपासून रुग्णसंख्या 887 पर्यंत गेला. तब्बल महिन्याभरात 3 एप्रिल रोजी शहर व जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 777 इतकी होती. दिवसेंदिवस परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर जात असून एकीकडे लसीकरण, दुसरीकडे रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि वाढविण्यात आलेल्या कोरोना चाचण्या यामुळे आरोग्य विभागावरील दैनंदिन कामकाजाचा ताणदेखील वाढला आहे. ग्रामीणच्या तुलनेत शहरातील कोरोना रुग्णसंख्येत 28 टक्क्मयांनी वाढ झाली तर मृत्यूदर देखील 4.4 इतके आहे.
शहरातील कोरोनाची परिस्थिती 1 मार्च – 12 हजार 456 10 मार्च – 12 हजार 796 20 मार्च – 13 हजार 796 30 मार्च – 15 हजार 794 3 एप्रिल – 16 हजार 976 महिन्याभरातील वाढ – 4 हजार 520 (28 टक्के) कोरोनाबाधित पुरुषांची टक्केवारी – 60 टक्के (10,100 कोराना बाधित स्त्रियांची टक्केवारी – 40 टक्के (6,876) एकूण मृत्यू – 748 मृत्यूदर – 4.4 |
ग्रामीण कोरोनाची स्थिती 1 मार्च – 40 हजार 571 10 मार्च – 41 हजार 228 20 मार्च – 42 हजार 465 30 मार्च – 45 हजार 305 3 एप्रिल – 46 हजार 980 महिन्याभरातील वाढ – 6 हजार 409 (14 टक्के) पुरुषांची टक्केवारी – 62 टक्के (29303) स्त्रियांची टक्केवारी – 38 टक्के (17677) एकूण मृत्यू – 1247 सरासरी मृत्यूदर – 2.7 |
बार्शीत 15 दिवसांत 1449 रुग्ण
संपूर्ण जिल्ह्यात 17 मार्चपासून कोरोनाचा भस्मासूर दिसू लागला. बार्शी तालुक्मयात 17 मार्च रोजी रुग्णसंख्या 7 हजार 198 इतकी होती तर 3 एप्रिल रोजी 8 हजार 647 इतकी आहे. अवघ्या 15 दिवसांत 1 हजार 449 ने वाढ दिसून आली. तसेच सध्या पंढरपूर तालुक्मयातील रुग्णसंख्या सर्वाधिक 9 हजार 044 इतकी आहे. त्यापाठोपाठ माळशिरस तालुका 8 हजार 363 हे तिन्ही तालुके कोरोना वाढण्यात टॉप थ्रीमध्ये आहेत. त्या पाठोपाठ माढा, करमाळा आणि सांगोला तालुक्मयांचा समावेश आहे.
या तालुक्यात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू
पंढरपूर, बार्शी आणि माळशिरस तालुक्यातील कोरोना रुग्णांची मृत्यू संख्या अधिक असून आजतागायत पंढरपूर तालुक्मयात 250, बार्शीत 228 तर माळशिरस तालुक्मयातील 164 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात मृत पावलेल्या 1 हजार 247 रुग्णांपैकी 40 टक्के मृत रुग्ण हे याच तीन तालुक्मयातील आहेत.
शहरात 277 तर ग्रामीणमध्ये 400 पॉझिटिव्ह रुग्ण शनिवारी शहरात 277 तर ग्रामीणमध्ये 400 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर उपचार घेऊन बरे झालेल्या 338+179 जणांना घरी सोडण्यात आले. सोलापूर शहरातील 2 हजार 43 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 277 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1 हजार 766 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 277 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 154 पुरुष तर 123 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 976 इतकी झाली आहे. सोलापूर जिह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये 4 हजार 672 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 400 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 4 हजार 272 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 400 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 275 पुरुष तर 125 स्त्रियांचा समावेश आहे. जिह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46 हजार 979 इतकी झाली आहे. |
आजपर्यंतची तालुकानिहाय रुग्णसंख्या अक्कलकोट 1411, बार्शी 8647, करमाळा 3681, माढा 5278, माळशिरस 8363, मंगळवेढा 2045, मोहोळ 2215, उत्तर सोलापूर 940, पंढरपूर 9044, सांगोला 3529, दक्षिण सोलापूर 1827 |