सोलापूर/प्रतिनिधी
जागेच्या वादातून नई जिंदगी परिसरात शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच हा प्रकार केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. नई जिंदगी परिसरातील मोसिन पानपट्टी जवळ दिवसाढवळ्या ही घटना घडली या घटनेची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. शकील पटेल असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. तो जागच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. जागेच्या वादातून गुरुवारी सायंकाळी वादावादी झाली आणि त्यातूनच सकाळी एका तरुणाने त्याची हत्या केल्याचे सध्या बोलले जात आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटना कळताच एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यामुळे नई जिंदगी परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे