कोरोना बिल ऑडिटसाठी 8658506314 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बार्शी
बार्शी शहर आणि तालुक्यांमध्ये कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक स्वरूपात वाढत चालल्याने बार्शीतील डेडिकेटेड हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालय येथील कोरोना केअर सेंटर आता कोरोना बाधित रुग्ण यांमुळे भरू लागले आहेत. शहरातील अनेक दवाखान्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांना बेड शिल्लक नाहीत अशी अवस्था बार्शीची आज झाली आहे. यावरती प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन शहरातील काही खाजगी दवाखाने सुद्धा कोरोना बाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी अधिग्रहित केली आहेत. मात्र काही खासगी दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्ण यांना उपचाराची बिले भरमसाठ आणि जास्तीची दिली आशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या यावरती उपाय म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी या दवाखान्या मधील कोरोना उपचार रुग्णांची बिले तपासण्यासाठी बिल ऑडिटर पथकाची नियुक्ती केली आहे.
या पथकाने सर्व दवाखान्यांना रोज भेटी देऊन कोरोणा रुग्णांची देण्यात येणारी अंतिम बिले किंवा देयके तपासूनच त्या रुग्णाला द्यायचे आहेत. यातून कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळणार असून बार्शीतील गोरगरीब नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
बिल ऑडीटर नावाचे सात सद्सिय पथक नियुक्त केले. असून त्या पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी आर. पी. रंगदाळ यांची नियुक्ती केली आहे. तर बाकी सदस्यांमध्ये कनिष्ठ लेखाधिकारी मानेरेड्डी सहाय्यक लेखाधिकारी भिसे, बार्शी नगरपरिषद सहाय्यक लेखाधिकारी गंभीरे, लेखापाल दराडे, लेखापरीक्षक अश्विनी जाधव, लेखापाल विशाल मरगल आदी सदस्यांचा समावेश आहे. जर कोणत्या रुग्णास आपले दवाखान्याचे बिल अधिक आले आहे असे वाटत असेल तर बिल ऑडिटर पथक नियंत्रण अधिकारी यांना 8658506314 या क्रमांकावर ती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने रुग्णांची बिले योग्य व्हावीत यासाठी बिल ऑडिटर नावाचे पथक नेमले आहे. मात्र या पथकाला मेडिकल क्षेत्राचा अनुभव नसल्याने काम करण्यास अडचण येऊ शकते त्यामुळे या पथकात वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव असलेले डॉक्टर, निवृत्त वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय क्षेत्राचे ज्ञान असणारी व्यक्ती या पथकात असणे गरजेचे आहे.
Previous Articleहार्दिक पांड्या झाला बाबा; ट्विटरवर शेअर केला मुलाचा फोटो
Related Posts
Add A Comment