प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज नवे १९ कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोगय प्रशासनाला प्राप्तीसाठी झाला असून कुर्डू, लऊळ, भोसरे, मोडनिंब, मानेगाव येथे हे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा ५०५ झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
तालुक्यात कुर्डू येथे १३, लऊळ येथे ३,भोसरे येथे १,मानेगाव येथे १ व मोडनिंब येथे १ असे १९ जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात असून सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन करुन प्रतिबंधीत करण्यात आला आहे.
कुर्डू येथे रुग्ण वाढण्याचे प्रमाण अधिक असल्याकारणाने स्थानिक प्रशासन व गावकऱ्यांच्या मदतीने या गावात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला असताना आज नव्याने १३ रुग्ण कुर्डू येथे आढळल्याने स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.
Previous Articleआता तालुका पातळीवरही खासगी इस्पितळात उपचार
Next Article जुलैमध्ये रत्ने-आभूषणांची निर्यात 38 टक्क्यांनी घटली
Related Posts
Add A Comment