तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 1 रुग्णाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 21 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.
सोलापूर शहरात सोमवारी 129 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 53 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 76 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 53 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 27 पुरुष तर 26 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5951 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 48455
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5951
प्राप्त तपासणी अहवाल : 4833
प्रलंबित तपासणी अहवाल : 125
निगेटिव्ह अहवाल : 42379
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 392
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1034
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 4525