-अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांची माहिती
-रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी एफएमची सोय
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर :
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आज, मंगळवारपासून विपश्यनाचे वर्ग सुरू केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.
कोरोना संसर्ग रोखण्याकरिता विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना बाधित व्यक्तींना सोलापूर शहरातील सिंहगड कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार देण्यात येत आहेत. तसेच त्यापुढे जाऊन रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य चांगले रहावे, यासाठी विपशनाचे वर्ग सुरु, पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी जेवणाबद्दल वारंवार तक्रारी येत होत्या. त्यानुषंगाने जेवणाची तपासणी करून जेवणा मधील त्रुटी जाणून घेतल्या. संबंधित केटर्सना जेवणामध्ये सुधारणा करण्यास सूचना देण्यात आल्या आहेत. इतर कोव्हिड सेंटरला सुद्धा लवकरच वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.
1523 रुग्ण बरे
आजपर्यत सिंहगड कोव्हिड केअर सेंटर मधून 1523 व्यक्ती बरे होऊन घरी गेल्या आहेत. त्याअनुषंगाने आज 1500 चा टप्पा पार केल्यामुळे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त पंकज जावळे यांनी या ठिकाणी भेट दिली. तसेच या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सोयीबद्दल माहिती जाणून घेतली.
Previous Articleउंचावते मनोधैर्य!
Next Article सांगली : सात जणांचा बळी, नवे 139 रूग्ण
Related Posts
Add A Comment