झोमॅटो मौल्यवान कंपनी ः डेलहीवरी, फार्मइझीचा सेबीकडे अर्ज
वृत्तसस्था/ नवी दिल्ली
आयीपीओचा सादरीकरणाचा हंगाम सध्या जोर धरू लागला असून जवळपास अर्धा डझनहून अधिक स्टार्टअप बाजारात रक्कम उभारणीसाठी तयारी करत असल्याचे समजते. एक डझनहून अधिकपैकी 3 स्टार्टअप कंपन्या आतापर्यंत शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत. तर 3 स्टार्टअप्सचा इशु 10 नोव्हेंबरपर्यंत बंद होणार आहे.
पॉलिसीबाजारचा इशु खुला
पॉलिसीबाजारचा सोमवारी इशु खुला झाला असून 3 नोव्हेंबर रोजी बंद होईल. 5 हजार 625 कोटी रुपये उभारण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. दरम्यान पेटीएम ही सर्वात मौल्यवान अशी स्टार्टअप कंपनी ठरली आहे. जी बाजारातून 18 हजार 3000 कोटी रुपये उभारणार आहे.
मोबीक्वीकला परवानगी
दरम्यान मोबीक्विकच्या आयपीओला सेबीने मंजुरी दिली आहे. कंपनी बाजारातून 1 हजार 900 कोटी रुपये उभे करणार आहे.
3 स्टार्टअप कंपन्या लिस्ट

दरम्यान वरील स्टार्टअपपैकी दोन स्टार्टअप्सनी बाजारातील नियामक सेबीकडे अर्ज सादर केल्याचे कळते. याशिवाय आणखी दोन स्टार्टअप्स आपला अर्ज लवकरच सेबीकडे दाखल करू शकतात, अशी शक्यता सांगितली जात आहे. सध्याला 3 स्टार्टअप्स लिस्ट आहेत. इझी ट्रिप प्लॅनर्सने 510 कोटी रुपये उभारले आहेत. ज्यांचे बाजारमूल्य 5 हजार 204 कोटी रुपये आहे. झोमॅटो सर्वात मौल्यवान स्टार्टअप ठरली असून त्यांचे बाजारमूल्य 1.03 लाख कोटींचे आहे. सदरच्या लिस्टेड कंपनीने बाजारातून याचवर्षी 9 हजार 375 कोटी रुपये उभारले आहेत. विशेष म्हणजे ही पहिली स्टार्टअप कंपनी आहे जिने बाजारात आयपीओ दाखल केला होता. तिसरी स्टार्टअप कंपनी कारट्रेड आहे, जिचे बाजारमूल्य 5 हजार 572 कोटी रुपये आहे. बाजारमूल्याशी तुलना करता ही सर्वात छोटी कंपनी आहे. सदरची कंपनी बाजारात लिस्ट असून बाजारातून कंपनीने 2 हजार 999 कोटी रुपये उभे केले आहेत. नायका ही चौथी स्टार्टअप कंपनी असून यांचा इशु सोमवारी बंद झाला आहे. 5 हजार 352 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे.