वाळपई बॉटनिकल वेलीमध्ये चेरीच्या झाडाला आली फळे
उदय सावंत /वाळपई
सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा प्रकारचे लागवड होऊ लागले आहे. महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी प्रसिद्ध असलेली स्ट्रॉबेरी आता सत्तरी तालुक्मयातील साटे या ठिकाणी शाम गावकर यांनी विकसित केली. यामुळे सत्तरी तालुक्मयाच्या हवामानामध्ये वेगवेगळय़ा प्रकारचे घटक दडलेले आहेत. यामुळे अशा प्रकारच्या लागवडी यशस्वी होऊ शकतात हे आता सिद्ध होऊ लागलेले आहे. साटे याठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आल्यानंतर आता नगरगाव पंचायत क्षेत्रातील शेळपे येथील चेरीची लागवड यशस्वी झालेली आहे.
वाळपई बोटॅनिकल वेली या फार्ममध्ये चेरीचे झाड सध्यातरी फळांनी बहरलेले आहे .यामुळे सत्तरी तालुक्मयात चेरीची लागवड यशस्वी होऊ शकते हे आता सिद्ध झालेले आहे.
याबाबतची माहिती अशी की चेरीची लागवड शक्मयतो थंड हवेच्या ठिकाणी होत असते .काश्मीर आदी सारख्या भागांमध्ये ही लागवड अत्यंत यशस्वी ठरलेली आहे. या उत्पादनाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे.. यामुळे उष्णतेच्या हवामानात चेरीच्या उत्पादनाला चांगल्या प्रकारची मागणी असते मात्र ही लागवड काश्मीरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी होऊ शकते. इतरत्र होऊ शकत नाही अशा अंदाज होता. मात्र वाळपई बोटॅनिकल वेलु या कृषी फार्म मध्ये सध्या चेरीची लावण्यात आलेले झाड फळांनी बहरलेले आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयांमध्ये चेरीची लागवड चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकते हे आता उदाहरणादाखल सिद्ध झालेले आहे.
डिसेंबर 2000 मध्ये लागवड.
या संदर्भात सदर फार्मचे अधिकारी राकेश सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की डिसेंबर 2000 साली सदर चेरीची लागवड करण्यात आली होती .त्याला चांगल्या प्रकारचे पाणी व्यवस्थापन व त्यानंतर त्याची चांगल्या प्रकारे निगा राखण्यात आल्यानंतर यांचा सदर चांगल्याप्रकारे बहर आला. जवळपास तीन महिन्यापूर्वी या झाडाला चांगल्या प्रकारची फुले आली होती. सध्या फुलांचे रूपांतर फळांमध्ये झाले असून आतापर्यंत आपण तीन किलो पेक्षा जास्त फळे काढल्याचे त्यांनी सांगितले.
चांगली चव.
सदर फळांच्या एकूण चवीबाबत विचारणा केली असता सध्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणारी फळे त्यांच्यापेक्षाही चांगली चव या फळांना असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. यामुळे सत्तरी तालुक्मयाच्या जमिनीमध्ये असलेली पोषकता यामुळे कदाचित ही चव चांगल्या प्रकारे आली असेल असा प्रकारचा अंदाज राकेश सिंग यांनी व्यक्त केलेला आहे. अंदाजांचा जवळपास 18 महिन्यांनी सदर झाडाला फळे आली असून येणाऱया काळात अशा प्रकारची लागवड करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे राकेश सिंग यांनी यावेळी स्पष्ट केले.
बाजारपेठ तयार करणे आवश्यक.
बाजारपेठे संदर्भात बोलताना राकेश सिंग यांनी सांगितले की सध्यातरी बाजारपेठेमध्ये चेरीचा वापर आईस्क्रीम केक ड्रायफूट यासाठी मोठय़ा प्रमाणात करण्यात येत असतो. सध्यातरी या ठिकाणी अशा प्रकारचे लागवडी होत नसल्यामुळे बाजारपेठेमध्ये याबाबत जागरूकता झालेली नाही. या भागामध्ये अशा प्रकारच्या लागवडीवर भर देण्यात आली तर चांगल्या प्रकारची बाजारपेठ गोव्यामध्ये निर्माण होऊ शकते असा दावा राकेश सिंग यांनी केलेला आहे.
आकर्षक रंगाची फळे.
या बागेमध्ये उत्पादित झालेली चेरी आकर्षक रंगाची असून त्यामध्ये पांढरी व तांबडय़ा रंगाची असल्याचे त्यांनी सांगितले .सध्यातरी सदर झाड जवळपास दोन मीटर अंतराचे असून हे झाड मोठय़ा प्रमाणात वाढू नये यासाठी त्याची निगा राखण्यात येत आहे. सध्यातरी या लागवडीवर या फार्ममध्ये संशोधन सुरू असून येणाऱया काळात या प्रकारची लागवड कशा प्रकारे आणखीन यशस्वी होऊ शकते यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे राकेश सिंग यांनी यावेळी स्पष्ट
वेगवेगळे संशोधन करण्यावर भर.
वाळपई बोटॅनिकल वेली फार्म कृषी क्षेत्रातील वेगवेगळय़ा प्रकारचे संशोधनात्मक लागवड करण्यासाठी प्रसिद्ध आहे .त्यांनी आतापर्यंत अनेक प्रकारची संशोधनात्मक लागवड केलेली आहे. या फार्ममध्ये आंब्याच्या वेगवेगळय़ा प्रकारच्या जाती आहेत त्या सुद्धा यशस्वी झालेले आहेत.