श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील झंडफरन शेरी गावात शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी स्फोटकांचा साठा जप्त केला. या कारवाईमध्ये हातबॉम्ब आणि ग्रेनेड हस्तगत केल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱयांनी दिली. लष्कर, सीआरपीएफ, एसएसबी आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहिमेंतर्गत ही कारवाई केली. झंडफरन शिरी गावात करण्यात आलेल्या शोधमोहीम आणि झडतीदरम्यान 11 ग्रेनेड आणि 11 यूबीजीएल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हँडग्रेनेडने हल्ला केला. शहरातील नोहट्टा भागातील ख्वाजा बाजार येथे ही घटना घडली. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.