प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असल्याने आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरात आहेत, मात्र महापालिका, पोलीस प्रशासन आणि आशा कार्यकर्त्यांचे काम सुरूच आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी माजी नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी मास्कचे वितरण केले. तसेच वॉर्डमध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
महापालिकेच्यावतीने स्वच्छतेचे काम नियमितपणे सुरू असून रयत गल्ली, हमालवाडी, भारतनगर क्रॉस क्रमांक 1, 2 आणि 3 परिसरात स्वच्छता काम करणाऱया कामगारांच्या सुरक्षिततेसाठी दिनेश रावळ यांनी मास्कचे वितरण केले. तसेच शहापूर पोलीस स्टेशनमधील अधिकारा, कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांना मास्कचे वितरण केले.