करडवाडी/ प्रतिनिधी :
संस्थेची नोंदणी 12 ए तंरतुदींनुसार केली असता, संस्थेचे संपूर्ण उत्पन्न करपात्र होत नाही. मुदत संपताच पूर्ण नोंदणी करून सवलतीस पात्र होता येत. तसेच इन्कम टॅक्स कायद्यान्वये 80 जी तरतुदींनुसार संस्थेची नोंदणी केली असता, संस्था आपल्या उत्पन्नाचा जो भाग डोनेशन म्हणून देते यावर सदर 80 जी कायद्यानुसार कंपनीस भराव्या लागणाऱ्या इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळते. सदर 80 जी ची नोंदणी ही मर्यादीत कालावधीसाठी असून मुदत संपताच पूर्ण नोंदणी करून सवलतीस पात्र होता येते,या बाबत धर्मादाय संस्था किंवा ट्रस्ट यांच्या संदर्भातल्या आयकर फायनान्स कायदा 2020 मध्ये सरकारने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. बऱ्याच विश्र्वस्त संस्था/ट्रस्ट या आयकर कायदा कलम 12 ए अंतर्गत नोंदवल्या जात आहेत. आणि ज्यांना 80 जी अंतर्गत मान्यता आहे. त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे बदल 01 एप्रिल 2020 पासून सरकारने जाहीर केले आहेत. या ट्रस्ट आणि संस्थांना देणगीदार यांची माहिती दर तीन महिन्यांनी आयकर खात्याला ऑनलाइन कळवावी लागणार आहे.
जे ट्रस्ट किंवा संस्था सन 2020 पर्यंत 12 ए आणि 80 जी अंतर्गत नोंदणी झाले आहेत, त्यांना आपल्या 12ए/80जी चे नुतनिकरण करावे लागणार आहे. या सर्व संस्थांना दिनांक 1 जून 2020 ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंत नुतनिकरण्यासाठी आयकर आयुक्त ,कार्यलय यांच्याकडे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करावे लागतील, तरी स्वयंसेवी संस्थेनी 12ए/80जी नुतनिकरण करावे असे आव्हान महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्यअध्यक्ष युवराज येडूरे यांनी केले आहे. आयकर आयुक्त यांच्याकडे स्वयंसेवी संस्थेचे 12ए/80जी ऑनलाईन नुतनिकरण प्रस्ताव दाखल करावे लागतील