प्रतिनिधी/ बेळगाव
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. यामध्ये बेळगावच्या स्वातंत्र्य सेनानींचे योगदान मोठे आहे. यापैकीच एक व्यक्तीमत्व म्हणजे राजेंद्र कलघटगी असून त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली असून त्यांच्या सत्कारानिमित्त त्यांना हर्दिक शुभेच्छा देवून दिर्घायुष्य लाभो, असे मनोगत कर्नाटक शासनाचे माजी प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघ आणि जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संघाच्यावतीने ज्ये÷ स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांचा सत्कार बुधवार मराठा मंदिर येथे करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली. तर राजेंद्र कलघटगी यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली आहे. यानिमित्त हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शंकरगौडा पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी ज्ये÷ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी आणि गंगाधर कामत यांचा देखील सन्मान करण्यात आला.
जिल्हा स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघाने माझा सत्कार करून जगाचे बळ दिले आहे. त्याबद्दल संघटनेचा कृतज्ञ आहे, अशी प्रतिक्रिया ज्ये÷ स्वातंत्र्य सैनिक राजेंद कलघटगी यांनी सत्कारास उत्तर देताना व्यक्त केली. स्वातंत्र्यासाठी अनेक योद्धांनी बलिदान दिले आहे. याळगी घराण्यातील 16 जणांनी या लढय़ात सहभाग घेतला. असे सांगून सत्काराबद्दल ज्ये÷ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बसवनगौडा चिकनगौडर यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकाऱयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याकरिता स्वतंत्र कार्यालय सुरु करून समस्यांचे निवारण करण्यात आले आहे. तसेच काही स्वातंत्र्य सैनिकांच्या समस्या शासनाकडे मांडल्या असून त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. हे कार्य संघटना करीत असते. अशी माहिती देवून स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकाऱयांना कोणतीही अडचण भासल्यास संघटनेकडे संपर्क साधावा, असे आवाहन बसवनगौडा चिकनगौडर यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील, सत्कारमूर्ती राजेंद्र कलघटगी, ज्ये÷ स्वातंत्र्य सेनांनी विठ्ठल याळगी, गंगाधर कामत तसेच उपस्थित पदाधिकाऱयांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते सत्कारमूर्ती राजेंद्र कलघटगी, विठ्ठल याळगी, गंगाधर कामत यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. संतोष भेंडीगेरी यांच्या हस्ते शंकरगौडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघाचे पदाधिकारी तसेच जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संघ आणि भारत सेवा दल जिल्हा समिती यांच्यासह नागरिक व स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी उपस्थित होते.