प्रतिनिधी / सातारा
रहिमतपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पत्रीसरकारचे पथकप्रमुख स्व.सेनानी सोपानराव घोरपडे आप्पा यांचे वयाच्या एकशे एकव्या वर्षी वर्धाप्प काळाने निधन झाले.रहिमतपूर येथे त्यांचे वर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात नातू, कन्या असा परिवार आहे.
घोरपडे आप्पा हे सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे संस्थापक व राज्य स्वातंत्र्य संघटनेचे दीर्घकाळ पदाधिकारी होते. सातारा शहरात आझाद हिंद सेनेतील देशभरात सर्वात जास्त सैनिक असलेने त्यांचे पुढाकाराने घोरपडे आप्पा यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर यांचे सहकार्याने नेताजी सुभाषचंद्र बाबू यांचा पुतळा उभारण्यात मोठे योगदान दिले होते. ते मानवेंद्र नाथ रॉय गटाचे सातारा जिल्ह्यातील सक्रिय नेते होते. ते रहिमतपूर नगरपरिषदेत दोन वेळा निवडून आले होते.
सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे म. गांधीचे स्मारक व्हावे म्हणून गेली सतरा वर्षे प्रयत्न करत होते. स्वच्छ चारित्र्य साधी राहणी संपूर्ण आयुष्य देश भक्ती व देश प्रेम जपत सर्वच डाव्या चळवती त ते सहभागी होत ते जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून दोन दशक काम पाहत होते. थोर स्वातंत्र्य सेनानी म्हणून महाराष्ट्रभर त्यांचा परिचय होता.जिल्हाभर सतत भटकंती करीत स्व. सैनिकाचे प्रश्न सोडविण्यात त्यांनी आयुष्य व्यतीत केले. त्यांच्या कृतार्थ जीवनाची ज्योत मालवली त्यामुळे 1942चे स्वातंत्र्य लढयातील एक चालता बोलता इतिहास हरपला.
Previous Articleतासगावात एकाच दिवशी 70 जण कोरोनामुक्त
Next Article महिला कर्जमुक्त झालीच पाहीजे!
Related Posts
Add A Comment