बेळगाव : विद्यानगर अनगोळ येथे भोसले परिवार येथील स्वामी समर्थ यांच्या मंदिरात प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळी स्वामी समर्थांची काकड आरती होऊन पूजा करण्यात आली. पाळण्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यानगर अनगोळ, भाग्यनगर येथील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वयंभू गणेश मंदिराच्या कार्यकर्त्यांनी महाप्रसादावेळी सहकार्य केले. यावेळी दामोदर भोसले व परिवार, राजू जाधव, रामा जोशीलकर, मारुती कदम, सुरेश पाटील, कृष्णा गवळी, सुधीर घोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleदीड महिन्यापासून समस्या जैसे थे
Next Article आरटीओ सर्कल मार्गावर वाहतूक कोंडी
Related Posts
Add A Comment