झ्युरिच : चॉकलेटप्रेमींना आता जगातील सर्वात मोठय़ा चॉकलेट म्युझियममध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. हे संग्रहालय स्वीत्झर्लंडच्या झ्यूरिचमध्ये सुरू करण्यात आले आहे. या संग्रहालयात शिरताच दरवाजापासून प्रत्येक गोष्ट चॉकलेटने तयार केलेली दिसून येणार आहे. लिंट होम ऑफ चॉकलेटमधील चॉकलेट कारंजाची उंची 30 फूट आहे. हा कारंजा संग्रहालयाच्या आकर्षणाचे केंद्र मानले जात आहे. संग्रहालयात शिरताच हा कारंजा दिसून येतो. तसेही झ्यूरिचला जगाची चॉकलेट राजधानी म्हटले जाते. हे संग्रहालय अनोखे असून यात जगातील सर्वात मोठे लिंट चॉकलेट शॉप देखील आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन जगातील महान टेनिसपटू रॉजर फेडरर यांनी केले आहे. येथे येणारे लोक स्वतःसोबत काही भेटवस्तूही घरी नेऊ शकतात. तसेच त्यांना चॉकलेटच्या इतिहासापासून त्याच्या उत्पादनाविषयी पूर्ण माहिती प्राप्त होणार आहे. तेथे असलेल्या चॉकलेटेरियामध्ये लोकांना स्वतःच्या हाताने चॉकलेट तयार करण्याची संधी मिळणार आहे. स्वीस चॉकलेट मेकिंगचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.
Previous Articleप्रभावी लसीसाठी भारत प्रयत्नशील
Next Article अडवाणी, जोशी, कल्याण सिंगांना दोषमुक्त करा!
Related Posts
Add A Comment