प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ात हडपद समाज नोकर संघाची स्थापना करण्यात आली असून वीरभद्र देवस्थान येथे नुकतीच बैठक पार पडली. ज्ये÷ जानपद तज्ञ डॉ. एस. पी. नावलगी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, हडपद समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. समाजातील नोकरदार मंडळींनी आपल्या हक्कासाठी पुढे आले पाहिजे. त्या दृष्टीने संघाची स्थापनाही महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, सर्वांनी निःस्वार्थीपणे काम करणे आवश्यक आहे.
या बैठकीत संघ स्थापनेचा उद्देश, कार्यकारिणी नेमणे, संघाची घटना तयार करणे, मुलांचे शिक्षण व उद्योग याबाबत चर्चा करण्यात आली. सुरेश नावी यांनी सूत्रसंचालन केले.
ईश्वरचंद्र बेटगेरी यांनी प्रास्ताविक केले. शिवपुत्रप्पा नावी यांनी आभार मानले.