ऑनलाइन टीम / हरयाणा :
जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस भारतात देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. शिंकल्याने, थुंकल्याने होणारा कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हरयाणा सरकार ने 30 जून पर्यंत च्युईंगम विक्री वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
हरयाणाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाग्रस्त शिंकला, थुंकला तर त्याच्या मुळे निरोगी माणसाला देखील कोरोना ची लागण होऊ शकते तसेच कोरोनाग्रस्ताने चघळलेले च्युईंगम थुंकले तर त्यातूनही कोरोना ची लागण होऊ शकते. त्यामुळे च्युईंगम विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
त्याचबरोबर पान गुटखा विक्रीवर घालण्यात आलेली बंदी अजून कठोरतेने राबवण्यात येणार आहे. असे ही प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये च पानमसाला, गुटखा विक्रीवर हरयाणा सरकारने बंदी घातली आहे.