ऑनलाईन टीम / चंदीगड :
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल हे स्वतः क्वारंटाइन झाले आहेत.
तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मनोहर लाल दिल्लीत एसवायएलच्या बैठकी दरम्यान शेखावत यांना भेटले होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्टाफ मधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर लाल हे कुरुक्षेत्र येथील खासदार नायब सैनी यांना भेटले होते. त्या दरम्यान सैनी यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी स्वतः क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला असून याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.
त्यामुळे मुख्यमंत्री आता विधानसभा अधिवेशनाला उपस्थित राहतील. दरम्यान, हरियाणा विधानसभा अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी कोरोनाची टेस्ट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.