ऑनलाईन टीम / चंदीगड :
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे (इनेलो) आमदार अभयसिंह चौटाला यांनी बुधवारी हरियाणा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्षांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
चौटाला यांच्या राजीनाम्यामुळे हरियाणातीलराजकारण तापणार आहे. कारण त्यांच्यानंतर आणखी काही आमदारांना राजीनामा देणे भाग पडेल. असे न करणाऱ्या आमदारांना त्यांच्या विभागातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे चौटाला यांचे मत आहे.
कृषी कायद्यांचे समर्थन करणाऱ्यांना गावात पंच म्हणून राहण्याचाही हक्क उरणार नाही, असेही ते म्हणाले.