ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मूतील एअर फोर्सच्या हवाई तळावर 27 जूनला झालेल्या ड्रोन हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचण्यात आला. पाक लष्करनिर्मित संघटना ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ने (टीआरएफ) या हल्ल्याचा कट रचला आहे. यामागे लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि आयएसआयचा हात आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
नरवाल भागातून अटक करण्यात आलेला टीआरएफचा दहशतवादी नदीम उल हक हवाई तळावरील हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे. नदीमकडे मिळालेले पाच किलो आयईडी त्याला जम्मूमध्येच देण्यात आले होते. त्याद्वारे नदीमला वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवून आणायचे होते. मात्र, त्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले आहे.