हाँगकाँगमध्ये दिवसभरात 43 नवे कोरोनाबाधित सापडल्यावर तेथे संसर्गाची चौथी लाट आल्याचे बोलले जात आहे. हाँगकाँग आणि सिंगापूर एअर ट्रव्हल बबल स्कीम सुरू करणार असतानाच ही चौथी लाट आल्याने हा निर्णय सध्या टाळण्यात आला आहे. या योजनेच्या अंतर्गत या दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱयांना विलगीकरणापासून सूट देण्यात आली होती. सध्या या दोन्ही शहरांदरम्यान दिवसातून एकच विमानसेवा सुरू असून त्याद्वारे 200 जण प्रवास करू शकतात. चौथ्या लाटेच्या स्रोताविषयी काहीच समजू शकलेले नाही. परंतु यामागे हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या नृत्यकार्यशाळा कारणीभूत असल्याचा प्रशासनाला संशय आहे. प्रशासनाने अशा 14 नृत्य कार्यशाळांची ओळख पटविली आहे. चालू महिन्यात या नृत्यशाळांमध्ये गेलेल्या सर्वांना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हाँगकाँगमधील नव्या नियमांनुसार प्रशासनाच्या सूचनेनंतरही चाचणी न केल्यास 19 हजारांहून अधिक रुपयांचा दंड तसेच 6 महिन्यांच्या कारावासाचीही तरतूद आहे. प्रशासन काही समुदायांची कोविड-19 चाचणी अनिवार्य करणार असून यात टॅक्सीचालक, घरगुती कामगार सामील आहेत.
Previous Articleलस बाजारात आणणार चीन
Next Article द्रव पृष्ठभागावर अनेक दिवस जिवंत राहतो विषाणू
Related Posts
Add A Comment