डिचोली/प्रतिनिधी
मास्काळ हातुर्ली मये येथील श्री कुमयेवंस आळयेवंस देवाच सातवा वर्धापनदिन आज सोम. दि. 17 जाने. रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त सकाळी 8 वा. श्री कुमयेवंस देवास अभिषेक व महापूजा, 11 वा. पारावर श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, 12.45 वा. देवास अर्पण केलेल्या वस्तु?ची पावणी व नंतर महाप्रसाद. संध्या. 5.30 वा. स्थानिक भजनी कलाकारांकडून भजन सादरीकरण, त्यानंतर देवगी चोडण येथील भजनी मंडळाकडून कार्यक्रम. षंध्या. 6.30 वा. भुमिका देवस्थान माडेल चोडण यांच्यातर्फे तालगडी कार्यक्रम सादर केला जाणार आहे.