ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या पत्नी नताशा हीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. हार्दिक ने स्वतः ही गोड बातमी ट्विट करुन चाहत्यांना दिली आहे.

हार्दिकने बाळाच्या हातात हात असल्याचा खूप गोंडस फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हार्दिकच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यावर त्याच्या लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
याआधी म्हणजेच प्रसूतिपूर्वी नताशा आणि हार्दिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात दोघांनी प्रसूतीसाठी जाताना आपला फोटो शेअर केला होता.