उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक छायाचित्र प्रसारित केले आहे. त्यांच्यानुसार संबंधित छायाचित्रात दिसून येणारा व्यक्ती विवाहित असून जो स्वतःची पत्नी आणि मुलामुलींसोबत रविवारचा आनंद घेत आहे. भले हा व्यक्ती शक्तिमान या सीरियलमधील ‘गंगाधर’सारखा वाटला तरीही प्रत्यक्षात तो एक पती असून जो बॅग, चप्पल आणि बुटांना हातात धरून स्वतःची सुटी इन्जॉय करत आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित झाले असून यावर लोकांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. काही जण हा इसम नक्की बंगाली असणार असे म्हटले आहे. तर काही लोकांनी याला देव मानुष (देवमाणूस) अशी मजेशीर उपमा दिली आहे.
गोयंका यांनी हे छायाचित्र प्रसारित करत ‘मी या विवाहित माणसाला पत्नी आणि मित्रांसोबत रविवारचा आनंद घेताना पाहिले’ अशी पुस्ती जोडली आहे. त्यांच्या या ट्विटला अडीच हजारांहून अधिक लाइक्स आणि 150 पेक्षा रीट्विट मिळाले आहेत.