वार्ताहर / उचगाव

सर्वसामान्य मनुष्य हा शहराच्या ठिकाणी जाण्यास वेळ काढतो. मात्र नागरिकांच्या गरजेच्या बाबी त्यांना जवळच उपलब्ध करून दिल्या तर त्याचा निश्चितच ते लाभ घेतात. यासाठीच बेळगाव पश्चिम भागातील जनतेसाठी लोकमान्य सोसायटीतर्फे दुचाकी पीयुसी चेकअप व मोफत नेत्रचिकित्सा अशा दोन शिबिरांचे आयोजन केले होते. याला या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. वाहन तपासणी व नेत्रचिकित्सा शिबिरात जवळपास चारशे नागरिकांनी सहभाग घेतला होता, असे मनोगत शाखा व्यवस्थापक मंदा खवनेवाडकर यांनी व्यक्त केले.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी हिंडलगा शाखेतर्फे एकदिवसीय पीयुसी वाहन तपासणी तसेच मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केले होते. वाहन तपासणीसाठी बेळगाव गाठावे लागते. त्याची याच परिसरात सोय झाल्याने आम्हा वाहनधारकांची सोय झाल्याचे वाहनधारकांनी सांगितले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर चंद्रशेखर पाटील, मार्केटिंग मॅनेजर गुरुप्रसाद तंगाणकर, हिंडलगा शाखेच्या मॅनेजर मंदा खवनेवाडकर, विनायकनगर शाखेचे मॅनेजर किशोर हळदणकर, गणेशपूर शाखेचे मॅनेजर सुनील तळवार, ऑडिट मॅनेजर चिदंबर कुलकर्णी, महेश गावडे, गणेश पवार, तसेच अवधूत चौगुले, पूजा भोगण, ओंकार चौगुले यांनी नेत्रचिकित्सा केली.
लोकमान्य सोसायटीने राबविलेल्या या दोन्ही शिबिरांमुळे नागरिकांची चागंली सोय झाली. त्यामुळे या शिबिरार्थिंमधून समाधान व्यक्त करण्यात आले.