पंधरा दिवसांनंतर बैठक आयोजित करण्यासाठी पीडीओ, जि. पं. अधिकाऱयांना निवेदन
वार्ताहर / हिंडलगा
सध्या सर्वत्र कोरोनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा स्थितीमध्ये एकाच ठिकाणी गर्दी करणे टाळले पाहिजे. शासनानेसुद्धा कोरोनाची नियमावली बनवली आहे. तरीदेखील हिंडलगा ग्राम पंचायतीने याकडे दुर्लक्ष करत सोमवारी (दि. 28) मासिक बैठक घेण्याचे ठरविले आहे. पण, सदर बैठकीमुळे सदस्य आणि कर्मचाऱयांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्मयता असल्याने काही सदस्यांनी बैठक घेण्यास विरोध केला आहे. पंधरा दिवसांनंतर बैठक आयोजित करण्याच्या मागणीसाठी पीडीओ, जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱयांना निवेदन दिले आहे.
रुग्ण जादा आढळल्याने काळजी घेण्याची गरज
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कोरोना रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत. बहुतांश जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परिणामी येथील परिस्थितीचे गांभीर्य पाहून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वतः भेट देऊन हिंडलगा येथे आठ दिवस लॉकडाऊन करण्याचा आदेश बजावला होता. त्यामुळे गावातील वातावरण थोडेफार नियंत्रणात आले आहे. पण, संपूर्ण स्थिती सुधारण्यास अद्यापही वेळ लागणार आहे. अशा स्थितीतही ग्राम पंचायतीने येत्या सोमवार दि. 28 रोजी मासिक बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आमचा विकासाला विरोध नाही, पण सदस्यांची व कर्मचाऱयांची संख्या जास्त असल्याने सदर बैठक रद्द करून 15 दिवसांनंतर घेण्यात यावी, अशी मागणी पीडीओंना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर ग्राम पंचायत सदस्य रामचंद्र कुदेमानीकर, विठ्ठल देसाई, प्रवीण पाटील, डी. बी. पाटील, राहुल उरणकर, गजानन बांदेकर, यल्लाप्पा काकतकर, अशोक कांबळे, परशराम कुडचीकर, चेतना अगसगेकर, बबिता कोकितकर, उमा सोनवडेकर, रेणुका भातकांडे, प्रेरणा मिरजकर, ज्योती घाटगे, अलका कित्तूर यांच्या स्वाक्षऱया आहेत.